मित्र पाहिजे
मित्र पाहिजे


आयुष्याच्या उत्कर्षाला तुझ्या सारखा मित्र पाहिजे
कोठे चुकले सांगायाला तुझ्या सारखा मित्र पाहिजे
प्रत्येकाला जग जिंकाया पुढे जायची घाई असते
संयम धरुनी चालायाला तुझ्या सारखा मित्र पाहिजे
नकोत आता भांडण तंटे आपसातल्या मतभेदाचे
निःस्वार्थाने वागायाला तुझ्यासारखा मित्र पाहिजे
अतिवृष्टीने शेतीवाडी गेली सारी पाण्याखाली
संकट समयी आधाराला तुझ्या सारखा मित्र पाहिजे
त्रयस्थ आता सल्ला देतो न्यायासाठी लढावयाचा
तडजोडीने मिटवायाला तुझ्या सारखा मित्र पाहिजे