STORYMIRROR

Shobha Wagle

Classics Inspirational Thriller

3  

Shobha Wagle

Classics Inspirational Thriller

योद्धा

योद्धा

1 min
165


या पाठीवर देशाचे, मी ओझे पेलत आहे

देशासाठी प्राणाची, मी बाजी लावत आहे


एकुलता आईचा मी, देशाचा योध्दा आहे 

मृत्यूचे मज भय नाही, सीमेवर झगडत आहे


देशाची भक्ती आहे, त्यागाची उर्मी ह्रदयी

देशासाठी लढण्याला, मी गौरव मानत आहे


झेंड्याची ताकद पाठी, शत्रूशी लढण्यासाठी

शेवटच्या श्वासा आधी, गनिमाला मारत आहे


सणासुदीला घरात मी, नात्यासोबत असतो का?

मी लढतो शत्रूसंगे, ना सण उपभोगत आहे.


 (वृत्त:-विद्याता गझल )



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics