संत बहिणाबाई
संत बहिणाबाई
जानकी आऊजींची कन्या थोर
नाव तिचे बहिणाबाई
परमार्थाचा ओढा अंगी
कीर्तनात ती तल्लीन होई
तुकोबांच्या अभंगावर
जिवापाड असे माया
दृष्टांत मिळता स्वप्नातून
गुरूबोधाने पालटली काया
उत्स्फूर्त भक्तीचा आविष्कार
ओसंडे तिच्या अभंगातून
बहिणा गाई ओव्या
शब्द झेलावे मुखातून
गुरूपरंपरा नाही सोडली
समाज प्रबोधन अंगीकारले
सनातनींचा पत्करून रोष
अजरामर साहित्य निर्मिले