आई
आई


सगळं आलबेल असूनही,
मन मात्र दुःखी होते..
आई तुझ्या पदराची,
मला नेहमीच आठवण येते
पैसा काय कामाचा,
जेव्हा असतो आजार..
नात्यांच्या बाजारात,
तुझ्या पदराचा आधार..
तुझ्याकडे पाहूनच होतं,
नेहमी जगण्याचं धाडस..
दूर असताना नेहमी
मिस करतं, तुला तुझं पाडस..