जीवनातले इंद्रधनुष्य
जीवनातले इंद्रधनुष्य
जीवनात येते इंद्रधनुष्य एकदा
मुलीच्या लग्नाची घटीका येते तेव्हा
आयुष्याला मिळते वेगळी कलाटणी
माहेरची कन्या सासरी होते सून जेव्हा.
दोन कुंटुंबांना ती मुलगी एकत्र करते
आईने शिकवलेले संस्कार उपयोगते
व्वाह व्वाह सासरकडून मिळवते
आईबाबांचे नाव सासरी उंचावते.
जर सासरी झाले तिचे कौतुक तर
आनंदी जीवनात काहीच कमी नसते
जन्म बालका दिल्यावर स्वर्ग मिळवते
होते माता तेव्हा धन्य धन्य होत असते.
मुलीच्या जीवनात येतात असे पडाव
क्षणो क्षणी तिला ते पार करावे लागतात
आलेल्या प्रत्येक संकटांचा सामना करते
अशाच सगळ्या संसारी आया असतात.
मुलीच्या आयुष्यात असे इंद्रधनुष्याचे
क्षण आले की होतेे सार्थक जिवनाचे
सौभाग्यवती तीच होत असे भाग्यवती
क्षण सुखद असतात तिचे असे भाग्याचे.