संकल्प
संकल्प
विसरुनी जाते आता
गेल्या वर्षाचे संघर्ष
माझे नवीन संकल्प
नक्की करील उत्कर्ष.
योगाभ्यास नियमित
हितकारी जीवनास
स्वतः मीच शिकवीन
लोका छान आरोग्यास.
कास धरीन सत्याची
भ्रष्टाचार विरोधास
प्राण पणाला लावीन
नाश त्याचा करण्यास.
निसर्गाला जपण्यास
वनराई वाढवीन
प्रदूषण रोकण्यास
एक झाड मी लावीन.