STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy

4  

Pandit Warade

Tragedy

तुझ्या भेटीसाठी

तुझ्या भेटीसाठी

1 min
27.6K


तुझ्या भेटी साठी त्याचं आसुसलं रे मन।

होती आस तू येशील नि जाशील बरसून।।


इथे लाखोंचा पोशिंदा भुके कंगाल जाहला।

असून बळी 'राजा' कसा भिकारी बनला।।


तुझ्या भरवशावरती बीज मातीत फेकलं।

'हिरवं सपान' तयाचं तू रे उधळून दिलं।।


कीव जीवाची रे कशी आज येईना तुजला।

कारे माणसासारखा असा निष्टूर तू झाला।।


स्वार्थ आणि भोगापायी झालो मंदमती।

अज्ञ बालकांना कळली नाही तुझी प्रीती।।


आम्ही अमुच्याच हस्ते झाडे वेलीही तोडली।

सृष्टी उजाड करूनि वाट तुझी बंद केली।।


काम तुझे तू करतो परी आम्ही विसरतो।

चुका करून आम्ही तुला शिव्याही घालतो।।


अपराध कोटी कोटी आता तरी घाल पोटी।

जीवनदायी तू पावसा ये आता भेटीसाठी।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy