व्यथा
व्यथा
नेता येतो हात जोडतो
आश्र्वासने देऊन मते मागतो //१//
सरकार येते सरकार जाते
शेतकऱ्यांची गरीबी तशीच राहते //२//
बायको बिचारी हिमतीने लढते
ख-या अर्थाने अर्धांगिनी होते //३//
फाटक्या संसारात आनंदात राहते
दु:ख गिळून लेकरांसाठी हसते //४//
पावसाच्या भरवशावर तो पिक पेरतो
निर्दयी पाऊसच खिल्ली उडवतो //५//
डोळ्यातील अश्रूंची कोण दखल घेतो
निसर्ग सुद्धा वा-यावर सोडतो //६//
कर्ज काढून तो पेरणी करतो
आभाळाकडं टक लावून पाहत राहतो //७//
पाऊसही निष्ठूर असा येतो
पेरलेलं सारं वाहून नेतो //८//
