STORYMIRROR

Mohini Shinde

Others

3  

Mohini Shinde

Others

आला पहिला पाऊस

आला पहिला पाऊस

1 min
14.4K


आला पहिला पाऊस

पाऊस ओल्या मातीचा

दरवळे वास मंद

मंद धुंद तो प्रितीचा


हर्ष झाला आज मनी

मनी तरंग उठले

आकाशात आले मेघ

मेघ काळे बरसले


नाचला मनमयुर

मनमयुर हर्षला

नटला निसर्ग सारा

सारा आसमंत न्हाला


बरसल्या जलधारा

जलधारा अंगणात

चिंब भिजली धरती

धरती कणाकणात


आले चैतन्य सृष्टीला

सृष्टीला नवजीवन

पाखरे गाती मधूर

मधूर ते संजीवन


बहरली सृष्टी सारी

सारी धरा मोहरली

आकाशाच्या मिलनास

मिलनास आतुरली


Rate this content
Log in