STORYMIRROR

Shrikant Bhore

Tragedy

4  

Shrikant Bhore

Tragedy

बिघडलं कुठं

बिघडलं कुठं

1 min
28.1K


वैशाखातल्या रखरखत्या उन्हात

काळी ढेकळं फोडताना ,

घश्याला कोरड आणि पायाला चटके बसताना,

A C त राहणाऱ्यांंनो,

माठातलं थंड पाणी आणि झाडाची सावली मागितली तर ,

बिघडलं कुठं.


पाऊस पडून धरणीमाय

पेरायसारखी झाल्यावर,

खता बियांचा तुटवडा निर्माण करणाऱ्यांनो ,

एखादं खताचे पोत अधिक आणि

कमी भावात मागितलं तर,

बिघडलं कुठं.


म्हणे महाराष्ट्रात विजेचा तुटवडा नाही,

नाही तो फक्त शहरात

नको त्यावेळी घरातील वीज चालू ठेवणाऱ्या सुक्षितांनो ,

लोड शेडींग च्या काळात,

२ तास वीज अधिक मागितली तर,

बिघडलं कुठं.


पोटाचा चिमटा काढून पिकवलेला माल

व्यापाऱ्याला विकताना,

कपडे आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात

फिक्स रेटच्या पाट्या लावणाऱ्यानो ,

शेतमालाला हमी भाव मागितलं तर ,

बिघडलं कुठं.


वरून राज्याची अवकृपा झाल्यावर

दिसरात तळहाताच्या फोडासारखं जपलेलं पीक

डोळ्यादेखत वळून जातं.

बळीराजाचं मन आत्महत्येकडं वळतं.

शेतकरी माय गाइगत हंबरडा फोडते.

अश्यावेळी पोटाची खळगी भरायला,

सरकारकडं थुडी मदत मागितली तर

बिघडलं कुठं.


Rate this content
Log in

More marathi poem from Shrikant Bhore

Similar marathi poem from Tragedy