Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Tanuja Mulay

Inspirational Others

3.9  

Tanuja Mulay

Inspirational Others

गौराई

गौराई

1 min
517


ती पहाटे उठते, ती केरवारे करते

दारात रांगोळी रेखाटून

योगासनं करते


ती भांडी घासते, ती फरशी पुसते

कपडे मशीनला लावून 

ती लॅपटॉप पुढं बसते


ती पोळ्या लाटते, ती कुकर लावते

भाजी फोडणीला टाकून

ती मेल चेक करते


ती बाळाला भरवते, ती सासू सासऱ्याना वाढते

दोन घास पोटात ढकलून 

ती मिटिंग अटेंड करते


ती निवडणं टिपण करते, ती दळण कांडन करते

ती दवाखान्यात जाऊन

रुग्णांना तपासते


ती लहानग्याला चिऊ-काऊंच्या गोष्टी सांगते

ती नवऱ्याचा डबा भरते

ती शाळा कॉलेजात जाऊन

नवीन पिढी घडवते


ती कविता लिहिते, ती कादंबऱ्या लिहिते

ती देशाची अर्थव्यवस्था सांभाळते

तर कधी सीमेवर जाऊन

देशाचं रक्षणही करते


ती हक्कांसाठी भांडते, 

ती अन्यायाला वाचा फोडते

ती संसारात राहूनसुद्धा

स्वतःचं अस्तित्व जपते


ती गाते, ती नाचते, ती भरपूर वाचते

ती रूढी-परंपरा सांभाळत

आपली संस्कृती पण जोपासते


ती व्हाट्सअप वापरते, ती फेसबुक पाहते

ट्वीटर, इंस्टा लीलया हाताळते

ती थकते, ती दमते

ती मेटाकुटीला येते


पण इच्छाशक्तीच्या जोरावर

पुन्हा नव्या आव्हानांना सामोरी जाते

ती म्हणजे शक्ती, ती म्हणजे भक्ती

ती म्हणजे दुर्गा, तीच सती पार्वती


आज गौराईच्या रूपाने

घराघरात विराजमान झालेली

चैतन्याची अखंड ज्योती


Rate this content
Log in