STORYMIRROR

Tanuja Mulay

Inspirational

4  

Tanuja Mulay

Inspirational

जगणं सुरू होतंय हळू हळू

जगणं सुरू होतंय हळू हळू

1 min
245

जगणं सुरू होतंय हळू हळू


भीत भीत, घाबरत घाबरत

कोषातून पाखरू बाहेर पडू लागलंय

हळू हळू


पक्ष्यांना गवसतोय पुन्हा सूर

नद्यांना येईल पुन्हा पूर

माणसांचे लोंढे

दबकत, दचकत

रस्त्यावर येऊ पाहतायेत

हळू हळू


फुललेली बाग, पहाटेची जाग

सकाळची रपेट आणि 

संध्याकाळचा वॉक

पुन्हा सुरू होतोय

हळू हळू


हातावरच्या पोटात मिळतोय दिलासा

घराकडे धावणाऱ्यांना मिळतोय आडोसा

रेंगाळलेली कामे लागलीत मार्गी

चिमुकल्यांच्या ओठांना घास

मिळू लागलाय 

हळू हळू


सुनसान रस्त्यांना येतेय जाग

शमवायला निघतील पोटाची आग

पोटाच्या भुकेचा अर्थ 

आता समजायला लागेल

हळू हळू


मोडतायेत पुन्हा इस्त्रीच्या घड्या

पेट्रोल भरायला निघ्याल्यात गाड्या

धोका तर आहेच

पण त्याबरोबर जगायला

आम्ही आता शिकतोय

हळू हळू


शाळेची बाकं, कारखान्याची चाकं

मुलांचा किलबिलाट 

आणि यंत्रांचा गडगडाट

ऐकू आता येईल

हळू हळू


थांबलेलं जग, हरलेली उमेद

निराशेची जळमटं

होतील दूर

ओठांवरचं हासू फुलणार

हळू हळू


जीवनगाणे थांबत नसते

जगायचे कोणी विसरत नसते

थांबत थबकत अंदाज घेत

'निसर्गाचे' तडाखे अंगावर झेलत

ओल्या मातीतून अंकुर फुटावा

तसं जीवन फुलतय

हळू हळू


नक्कीच लवकर संपेल कोरोना

माणसाला माणूस भेटेल पुन्हा

तोपर्यंत पुन्हा जगण्याची

रंगीत तालीम मात्र

सुरू होतेय हळू हळू

होतेय हळू हळू

हळू हळू...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational