STORYMIRROR

Tanuja Mulay

Others

3  

Tanuja Mulay

Others

निर्धार

निर्धार

1 min
12K

वाटलं नव्हतं, स्वप्नात सुद्धा

वेळ अशी येईल

माणसापेक्षा जवळचा

वाटेल मोबाईल


शाळा बंद, ऑफिस बंद

थकले सगळे उपाय

इंटरनेटशिवाय आता

नाही तरणोपाय


मालिकांचे तेच तेच जुने भाग पाहून

सगळे झाले बोअर

दूरदर्शनच आता वाटू लागलंय

सर्वांपेक्षा थोर 


पार्सल पॉईंट, हॉटेल्स आता

सारेच झाले बंद

पुरवतायेत सुगरणी

आपला स्वयंपाकाचा छंद


नाटक, सिनेमे, मॉल बिल

बाहेर फिरणं थांबलय

अंगातल्या सुप्त गुणांना

आता मोकळं आभाळ मिळतंय


जिम बीम, जॉगिंग ट्रॅक

सगळं झालय बेकार

घरातल्या घरातच

आता घाला सूर्यनमस्कार


लहानपणी ऐकलं होत

पुस्तक म्हणजे मित्र

घराघरात दिसू लागलंय

आता हेच चित्र 


जगाकडे बघता बघता

स्वतःलाच होत हरवलं

साधं सुद्धा जगता येत

हेच होत विसरलं


वाटलं नव्हतं स्वप्नातसुद्धा

वेळ अशी येईल

एक छोटा विषाणू जगणं

शिकवून जाईल 


शांतपणे घरी राहू 

घेऊ थोडी माघार

संकटातून या बाहेर पडण्या

हाच हवा निर्धार


Rate this content
Log in