STORYMIRROR

Tanuja Mulay

Tragedy

3  

Tanuja Mulay

Tragedy

राहूनच जात काही...

राहूनच जात काही...

1 min
390

होत अस कधी कधी

   कितीही प्रयत्न केला तरी

         चुकतच जातं काही


कितीही करा कुणासाठी

       कमीच पडत काही


कितीही बांधून ठेवल तरी

        सुटतच जात काही


बोलायचं खूप असतं पण

       शब्दच मिळत नाही


लिहावंसं वाटत पण

     सुचतच नाही काही


श्रोत्यांनी सजते मैफील पण

         सूरच जुळत नाही


सगळं काही असतं पण

        मनच लागत नाही


अशावेळी सोडून द्यावं

    ओझं मनावरचं फेकून द्यावं

घ्यावा एक दीर्घ श्वास

  स्वतःला शिक्षा देऊ नये

       विनाकारण झुरु नये


मनाला एकच समजवाव

     कितीही जीव पाखडला तरी 

  राहूनच जात काही...

    राहूनच जात काही...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy