STORYMIRROR

Tanuja Mulay

Others

3  

Tanuja Mulay

Others

आमची मुंबई

आमची मुंबई

1 min
809

आज ती शांत झालीये,

सगळा कोलाहल, सगळी गजबज

काही काळाकरिता थांबलीये

कधीही न थांबणारी

माझी लाडकी मुंबई,

आज शांत झालीये


सगळ्यांचं पालनपोषण करणारी

आपल्या लेकरांना उपाशी न झोपू देणारी

सगळ्या देशाची मुंबाई

आज कोपलीये

आज ती शांत झालीये 


रेल्वेच्या रुळावरून धडधडणारी

लाखो प्रवाशांची ने आण करणारी

देशाची रक्तवाहिनी,

आज थंड पडलीये

आज ती शांत झालीये


चैतन्याने सळसळणारी

उत्साहाने ओथंबणारी

लाखो दिलांच्या हृदयाची धडकन

बॉलीवूडची राणी

आज रुसलीये

आज ती शांत झालीये 


गिरणगावतल्या यंत्रांची खडखड

कोणी उपाशी राहू नये म्हणून

डबेवाल्यांची धडपड

शेअर मार्केटमधली गडबड

काही काळाकरिता बंद पडलीये

आज ती शांत झालीये


चौपाटीवरची धमाल

कलंदर माणसांची कमाल

पैशांनी मालामाल

दिवस-रात्र चालणारी उलाढाल

आता मात्र थांबलीये

आज ती शांत झालीये


आजवर कितीही मोठ्या संकटापुढे

हात न टेकणारी

क्षणभरही न थांबणारी

कधीही न हरणारी

निसर्गापुढे आज मात्र 

हतबल झालीये

आज ती जरा शांत झालीये


घेऊ देऊया तिला जरा मोकळा श्वास

दोन क्षण विसावून 

तुमची आमची लाडकी मुंबई

नक्कीच पुन्हा धावू लागेल

नव्या आशेने नव्या जोमाने 

पुन्हा उभी राहील हमखास 

पुन्हा उभी राहील हमखास...


Rate this content
Log in