STORYMIRROR

Tanuja Mulay

Romance

3  

Tanuja Mulay

Romance

कोजागिरी

कोजागिरी

1 min
320

जस चांदणं दुधाळ

तीच बोलणं मधाळ

अशी सुंदर ही नार

जशी अर्ध चंद्रकोर ।।


कटी नाजूक शेलाटी

अंगी चंदनाची उटी

रंग गोरा केतकीचा

गजरा हा मोगरीचा ।।


काळे कुरळे कुंतल

बट रुळे भाळावर

हरिणीच्या नजरेने

वाट पाहे भीरभिर ।।


सखा येता प्रियकर

लाजुनिया झाली चूर

जरी झाली गोरिमोरी 

परी फुलले अंतर ।।


असा साजरा साजन

त्याची सजनी साजरी 

पूर्ण चंद्र तो नभीचा

त्याची वधू कोजागिरी ।।


अश्विनाच्या चांदण्यात

अशी रात बहरली

वृष्टी सुखाची जाहली

तिची काया मोहरली ।।


धरित्रीच्या उदरात

नवी बीजे अंकुरली

चाले सुखाचा सोहळा

किती युगे ती लोटली ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance