STORYMIRROR

Tanuja Mulay

Fantasy

3  

Tanuja Mulay

Fantasy

कवितेचा जन्म

कवितेचा जन्म

1 min
239

हृदयाचा कागद आणि 

विचारांची लेखणी

जन्माला येते , कविता देखणी

मनाच्या पटलावर

आठवणी लागताच स्मरू

नकळत कागदावर 

शब्द लागतात झरू

कवितेला या ना स्थळाच बंधन

ना काळाच भान

ढग दाटून येताच

सरींनी होत चिंब रान

मनातलं वादळ होऊ

लागत अनावर

लेखणीला फुटतो

शब्दांचा पाझर

अनुभवांचा खळाळता निर्झर

कविता म्हणजे

अथांग सागर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy