STORYMIRROR

Tanuja Mulay

Others

3  

Tanuja Mulay

Others

नियती आणि माणूस

नियती आणि माणूस

1 min
933

नियतीचा घाला 

असा काही आला

मानवाचा अभिमान 

चक्काचूर झाला


सर्व सृष्टीचा मालक

असल्याच्या थाटात वावरला

निसर्गाच्या पुढे मात्र

झाला अर्धमेला


जगा आणि जगू द्या

हे तत्त्व विसरला

पर्यावरणाची हवी तशी

लूट करू लागला


निसर्गाने असा काही

धडा शिकवला

गर्वाचा डोंगर

पार खाली उतरला


पूर भूकंप दुष्काळ

नित्याचाच झाला

त्यात पुन्हा महामारीचा

डोंब उसळला


आता मात्र माणूस

पुरता समजला

देवापुढं माणूस

आहे पालापाचोळा...


Rate this content
Log in