Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ravindra Gaikwad

Inspirational Others

4.0  

Ravindra Gaikwad

Inspirational Others

दूर केला अंधार

दूर केला अंधार

1 min
323


क्रांतिसूर्य ज्योतिबा सम महात्मा

नाही जगी या कधीच होणार!

पेटवून ज्ञान ज्योत त्यांनीच

दूर केलाय साराच अंधार...


अविद्येचा अनर्थ करूनी या दूर

केले ज्योतीबाजींनी उपकार फार,

खाल्ले दगडगोटे, शेणाचा ही मार

बहुजनांचा खरा केला हो उद्धार...


लई अनमोल समाजकार्य

दिली समतेची शिकवण,

किर्ती जगी त्यांची महान

केले प्रबोधन, अनिष्टतेवर प्रहार...


समाजोद्धारासाठी झगडले

कर्मठावर आसूड ओढले,

सत्यशोधकी घडविले, घडले

आयुष्य वेचले त्यांनी सारं...


न्याय, हक्काचा लढा दिला

उद्धार राष्ट्राचा या केला,

मार्ग समतेचा जगा दाविला

असा महात्मा जगी न होणार...


महती ज्योतीबांची आज गाऊ

शिकवण जगाला त्यांची देऊ,

त्यांचा वारसा पुढे चालू ठेऊ

देऊ क्रांतीची मोठी ललकार...


Rate this content
Log in