राजकारण
राजकारण


जिथे राजकारण, अर्थकारण आहे
तिथे भांडवलदारीचे, पेव आहे।
लोकशाही राष्टाला डोईजड होत आहे
हिटलरवादी प्रवृत्ती वाढतच आहे।
चोर, लुटारू देशावर राज्य करत आहे
पक्षांतराला प्रचंड भाव आहे।
रिकामटेकड्यांचा इथे आश्रय आहे
पत्यांचा डाव इथे जोरात आहे।
गांवखेड्यात राजकारणाचा जोर
आहे।
चांडाळचौकडीचा इथे नुसता ताव
आहे।