STORYMIRROR

Ramchandra Pandit

Inspirational Others

3  

Ramchandra Pandit

Inspirational Others

एक व्हा रे सारे

एक व्हा रे सारे

1 min
495

निळ्या निळ्या आभाळी चमचमते तारे 

एक व्हा रे सारे तुम्ही एक आता व्हा रे 


नको जात नको पात 

त्यासाठी ना रक्तपात 

जातीसाठी दंगेधोपे 

देशपायी मरणे सोपे

जातीला त्या देऊनी माती 

एक सारे व्हा रे 

निळ्या निळ्या आभाळी चमचमते तारे 


हा गुजराती, हा मराठी 

वैदर्भी ना कुणी बंगाली 

पंजाबी ना कोणी मल्याळी

ना कर्नाटकी ना कोणी हरयाणवी

हिंद सारे एक व्हा रे 

निळ्या निळ्या आभाळी चमचमते तारे

 

तिरंग्यापुढे झुकला माथा

समानतेचा द्या रे नारा 

कलाम अब्दुल, लाल बहादूर, 

शास्त्रींचा निस्वार्थी बाणा 

आता एकच हा बाणा 

वंदे मातरम म्हणा 

समानतेचा मंत्र जपा रे 

एक व्हा रे सारे तुम्ही एक आता व्हा रे 

निळ्या निळ्या आभाळी चमकतील तारे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational