राधा ही बावरी
राधा ही बावरी

1 min

449
घटभरला डोईवरी हिंदळतो
माठ सखे
नदीकाठी बासरीचा
घुमला बघ नाद सखे
कृष्ण तुझा सखा अन् राधा तू बावरी
आपल्याच नादात
कान्हा वाजवितो बासरी
बासरीच्या नादाने हंबरती गाई-गुरे
करिती घायाळ तुझ्या
पायातील घुंगरे
कानावर येते तुझ्या
बासरीचे मंजुळ सुर
सावर त्या पदराला
भिरभरते तुझी नजर
घट भरला माठ सखे
डुचमळतो सारखा
वाट तुझी पाहतो
नदीकाठी हा कृष्ण सखा