अनोखी शांतता...
अनोखी शांतता...


त्या निर्भर शांततेत मन माझे डोकावते,
नको त्या विचारांचे वादळ उठवू पाहते,
एकांत शोधत भरकटले होते,
अन् तरी सावट बनून माझ्या मागे ते होते,
नेहमी अनुभवत असलेला तो गारवा,
का कोण जाणे आज वेगळाच होता,
मी मुक्त संचार करावा,
म्हणून तो तिथे आला असावा,
त्यासाठी सारे पाश तोडून आले होते,
तरीही मन काही शांत नव्हते,
वाटत होते सारावे मागे भूतकाळाला,
विनाकारण ओझं नको ना भविष्याला,
त्या हवेतल्या गारव्याला मी बिलगावे,
त्याच्या कवेत सारे सामावून जावे,
भूतकाळातील सर्व पाने मिटवून,
शांततेला द्यावे नवे आयुष्य पुन्हा भेटवून...