"स्त्री - रंग आयुष्याचे"
"स्त्री - रंग आयुष्याचे"

1 min

178
रंगले या अनोख्या रंगात,
आयुष्याच्या सरता वाटेत,
दिले मला सारे काही,
या एका नव्या आयुष्यात,
रंगताना ना कसले भान असावे,
उंच आभाळात उडण्याचे स्वप्न धरावे,
स्वप्न स्फूर्ती होऊन ही,
जगण्याचे नवे नियम करावे,
आयुष्याच्या नव्या वाटेवर,
मनातले सारे बोल सामावून जावे,
कुठूनतरी आधाराचा हात येऊन,
धगधगत्या आयुष्यात उभे रहावे,
दाखवून दयावे जगास,
नाही मी भोळी भाबडी स्त्री,
रोजचे दुःख मनात साचवताना,
रोजच्या अपशब्दाने जीव कासावितो,
नवा जन्म घेऊनी,
आई अनाथांची होऊनी,
आयुष्यातल्या एका पावलावर,
स्त्रीच्या हक्कासाठी सारे आज लढले,
उंच नभी झेप घेऊनी,
क्षितिज्याला मी गाठले,
जन्म हा माझा समाज कार्यात मिटो,
सन्मान हा स्त्री जातीला मिळो....