STORYMIRROR

Mayuri Ghag

Romance Tragedy Action

3  

Mayuri Ghag

Romance Tragedy Action

ओढ

ओढ

1 min
211

तुझ्या भेटीसाठी मी आतुरलो,

तू पाठविलेले पत्र वाचत,

तुझ्या टपोऱ्या डोळ्यातला भाव आठवत,

तुझ्या आठवणीत मी रमलो


आकाशात दिसला एक तुटता तारा,

त्याच्याकडे मागितला पहिल्या भेटीचा इशारा,

त्याने दिला तुझ्या प्रेमाचा रंग सारा,

त्याला पाहून स्तब्ध झाला हा गार वारा


जीव माझा आसावला,

तुझ्या भेटीसाठी तुझ्यात गुंतला,

उमजून सारे खेळ हा मांडला,

तरीही सुखाचा डाव त्यात रंगला


शब्द झाले मुके बोलती नयने,

गाली आले तुझ्या कोवळे लाजणे,

नजर चोरून पाहणे तुझे,

धुंदावते मन माझे


हे नाते असे कोणते?

जे स्वतःस परके करते,

हे असे माझे तुझे नकळत जोडते,

साताजन्मांचे अतूट नाते


चालण्या तुझ्या सवे,

आयुष्यभरासाठी नवे,

नाते हे मला हवे

नाते नवे मला हवे



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance