प्रवास
प्रवास


अलीकडेच सुरू झालेला शब्दांचा खेळ,
कधी न संपणारा होता,
नुकतीच प्रवासाला सुरुवात झाली होती,
पण रस्ता वळणं घेणारा होता,
काही ना काही सूचत होतं त्या वळणावर,
एकेका ओळींना जोड देत,
दादही मिळत होती प्रत्येक शब्दांवर,
पण लक्ष्य होतं मोठा पल्ला गाठण्यावर,
केली होती सुरुवात एका चारोळीपासून,
अन् आता त्याची नकळत कविता झाली,
मनातली व्यथा कवितेतून मांडलेली,
ती मी माझी पहिली कविता लिहिली,
त्यातूनच स्पर्धेच्या युगाशी नवी ओळख झाली,
थाप कौतुकाची मिळवत या प्रवासात स्वप्ने सारी माझी रमली,
प्रवास जरी मोठा असला, तरी थकली नाही पावलं,
शब्दाच्या या अथांग समुद्राचे महत्त्व कळलं...