STORYMIRROR

Mayuri Ghag

Romance Action

3  

Mayuri Ghag

Romance Action

देशील ना साथ!

देशील ना साथ!

1 min
342

त्या वाटेवर तू दिसावे

क्षणाचाही विचार न करता, तुझ्या पास यावे,

बोलून मनातले मोकळे मी व्हावे

त्या एका भेटीत तुझे माझे सूर जुळावे,


नको मला काही, फक्त हवास तू

तुझ्याविना दुसरे जग नको, ना दुसरे ऋतू,

सोबत हवी तुझी, हरएक क्षणा

अशी साथ तुझी, देशील ना मला,


पाहता क्षणी आपुलेसे वाटले

हे वेड जे प्रेमाचा बंधाने जुळले,

ना कधी कशी मी तुझ्यात गुंतले

त्या क्षणात भान सारे हरपून गेले,


हुरहूर होती हळुवार ओठांवरी आली

जादू ही कसली झाली,

दोन मने ही जुळली

नकळत वेल आयुष्याची फुलवून गेली,


साथ तुझी जन्मांतरीची

आयुष्यातल्या अनमोल क्षणाची,

प्रत्येक पावलावरच्या सुखा दुःखाची

देशील ना साथ आयुष्यभराची...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance