प्रिय शत्रू
प्रिय शत्रू
आयुष्य गेलं माझ्यावर जळण्यात
हिसका अजून काही जात नाही
लाडक्या शत्रूंना माझ्या आजही
माझी प्रगती बघवली जात नाही
मीच तेवढी स्मार्ट आणि हुशार
असं सतत असतं मिरवायचं
अहो पण विहिरीतच नाही
तर पोहऱ्यात कुठून आणायचं
जगाला देतात फुकट सल्ले
तोडत राहतात अकलेचे तारे
किती तो मत्सर अन् तो हेवा
वाटे त्यांनाच मिळो मेवा
नेहमीच पुढे पुढे करण्यात
सदा यांचा नंबर पहिला
दुसऱ्यांना सदैव कमी लेखणं
असतो त्यांचा हेतू खरा
समर्थांची दास मी खरी
भिते फक्त कर्माला
भीक कधी घालत नाही
असल्या अतिशहाण्या लोकांना