रंग
रंग
रंग, रंग, रंग ,रंग.रंग होळीचा हा रंग
रंगपंचमीचा रंग ,रंग, रंग ,रंग,रंग
रंग निळा,निळा रंग, निळ्या आकाशाचा रंग
चन्द्र,सूर्य,तारे संग, रंग,रंग,रंग,रंग
रंग भगवा,भगवा,वीरतेचा हा रंग,
रंग त्यागाचा हा रंग. रंग ,रंग,रंग,रंग
शांततेचा श्वेत रंग,शुद्धतेचा पांढरा रंग
रंग बुद्धीचाही रंग. रंग,रंग,रंग,रंग
हिरव्या पाचूचा हा रंग,झाडं, वेलींचा हा रंग
हिरवळीचा ,ऐश्वर्याचा, रंग. रंग,रंग,रंग,रंग
असीम ज्ञानाचा हा रंग.शुद्ध मैत्रीचाही रंग
अंगी लावियेल्या हळदीचा पिवळा रंग
रंग,रंग,रंग रंग लाल,लाल रंग,
प्रेमाचा लाल रंग,पराक्रमासह संपदेचा लाल रंग,
रंग ,रंग,रंग,,रंग रंग जांभळा ,जांभळा
अध्यात्मिकतेचा रंग जीवनाचे सार ज्यात
रहस्यमयी जांभळा हा रंग
रंग,रंग,रंग ,रंग ,रंग काळा, काळा रंग,
विठूरायाचा हा रंग गळा घातल्या ह्या माळा,
कृष्णतुळसीचा रंग ,रंग,रंग,रंग,रंग
रंग गुलाबी हा रंग गुलाबी प्रणयाचा रंग
प्रिया बावरी ती होते सजनाच्या संग
शृंगारमयी प्रणयी गुलाबी हा रंग
रंग ,रंग,रंग,रंग ,तपकिरी रंग
या भूमातेचा रंग,रंग निसर्गाचा रंग
आरोग्याच्या निरोगीपणाचा रंग
रंग खेळा,खेळा, खेळा,,रंग खेळण्या मेळा
रंग खेळा हो जपून नाती,गोती सांभाळून
रंग खेळा हो जपून,सारे पावित्र्य राखून
करा मंगलमय हा सण ठेवून नैतिकतेचे भान
रंग खेळात व्हा दंग, नका करू रंगाचा बेरंग रंग,रंग,रंग,रंग,रंगपंचमीचा रंग ,होळीचा हा रंग
