माझी सखी सोबती
माझी सखी सोबती
मी जिथे जाईल तिला
माझ्यासोबत यायचचं असतं...
मग सगळ्यांच्या खांद्याकडे,हाताकडे
तिच बारीक लक्ष असतं...
कोण कसं दिसतंय याकडे
तिची नजर खिळलेली असते..
तू मला का नाही नटवलस
म्हणून रुसून बसते...
तिला कोण सांगणार
तिला नटण्याची गरजच नसते,
ती स्वतःच इतकी सुंदर असते...
अशी सुंदर माझी सखी सोबती
"पर्स" नेहमी माझ्यासोबत असते,
आणि माझ्या वस्तूंची काळजी घेते..
