प्रेम आणि पाऊस
प्रेम आणि पाऊस
अबोल सारी पाखरे
गुणगुण ही करिती
जेेव्हा या आकाशातून
रेेशीमधारा पडती...
नभ ही दाटून आले
पालवी ही सुुुखावली
मातीचा सुुगंध आला
धरणी गहिवरली...
तन चिंंब चिंब झाले
ओथंबल्या मनी धारा
गंध पारिजातकाचा
जणू मनी पसरला....
तुझ्या माझ्या या प्रेमाला
श्रावण हा साक्षीदार,
तू सख्या आहेेेस माझ्या
जीवनाचा शिल्पकार....
तुझविन जगण्याचा
विचारही मनी नाही
तुझीया श्वासाशिवाय
माझ्यातही श्वास नाही...

