STORYMIRROR

Sarika Jinturkar

Tragedy Others

3  

Sarika Jinturkar

Tragedy Others

आपलेच कसे बदलतात

आपलेच कसे बदलतात

1 min
128

वेळ बदलली की नात्यांची गणित ही बदलतात स्वार्थापुरते जवळीक साधणारे कधीच कुणाचे नसतात

सुखाचे सोबती सारे दुःखात पळ काढतात 

आपलेच पण कसे बदलतात..!  


ज्यांना आपल्या असल्या नसल्याने फरक पडतो 

फक्त तेच खरे आपले जवळचे असतात बाकी दिखाव्या पुरती आपुलकी दाखवणारे  

क्षणभंगूर आयुष्यात हेवेदावे करून रस्सीखेच चालवतात

 आपलेच पण कसे बदलतात..!  


वाईट वाटत जेव्हा आपलीच 

माणस आपल्या विरोधात जातात

 इतरांनी आपल्याला समजून घ्याव अस वाटत असल तरी आपलेच लोक आपल्याविषयी गैरसमज करून घेतात


वयाने स्वार्थीपणा आल्याने लहानपणीचा निस्वार्थीपणा सहज विसरून जातात

 आपलेच पण कसे बदलतात..! 


 आयुष्याच्या वाटेवरती चांगले वाईट दोन्ही अनुभव येतात पण चांगले अनुभव न देता वाईट 

अनुभव देणारे आपलेच असतात  

प्रत्येकाची वेळ नक्की 

येते हे मात्र ते विसरतात 

आपलेच पण कसे बदलतात..! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy