STORYMIRROR

Ashok Ingole

Tragedy

3  

Ashok Ingole

Tragedy

शेवटचा टप्पा (एक काव्य कथा)

शेवटचा टप्पा (एक काव्य कथा)

1 min
170

वृद्धाश्रमाच्या खिडकीतून तो बाहेर बघत होता

स्वतःचा भूतकाळ तो पुन्हा पुन्हाआठवत होता

बाहेर बागेत एक लहान मुलगा खेळत होता

जवळच लॉनवर त्याचा वडील लोळत होता

त्याची आई कौतुकाने त्याच्या कडे बघत होती

त्याच्या वडिलांशी ती आनंदाने बोलत होती

त्या कुटुंबाला बघून याला फार दाटून आले

आयुष्यातील असेच क्षण केव्हाचेच निघून गेले

त्याने जीवन भर कष्ट करून मुलाला शिकविले

मित्राने एकुलती मुलगी देऊन त्याला पूर्ण फसविले

सुनेच्या त्रासा ने पत्नी नैराश्यात जग सोडून गेली

सून मुलाला कायमची माहेरी सोबत घेऊन गेली

राहते घर विकून मुलाला पुण्यात फ्लॅट घेऊन दिला

मुलगा ही बापाला सोबत राहायला घेऊन गेला

मित्र स्वतःचा फ्लॅट विकून तिथेच राहायला आला

मग मात्र पिताचा व पुत्राचा घरात बराच वाद झाला

सुनेने मग या मुद्द्यावर मुलाचेच कान ओढले

सासर्‍याला त्वरित तिने वृद्धाश्रमात धाडले

पत्नीची वारंवार त्याला आठवण येत होती

डोळ्यातील अश्रूची धार गालावरून वाहात होती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy