तुला कळत कसं नाही
तुला कळत कसं नाही
दुःख माझं काय आहे
हे तुला कळत कसं नाही,
पंचपक्वांन्न समोर असताना
आस्वाद घेता येत नाही
नेहमीच जवळ असताना
दिसत कसा नाही,
माझ्या जीवाची उलघाल
तुला कळत कशी नाही
घे जाणून कधीतरी
माझ्या अंतरीच्या भावना,
दुःख ओसंडून वाहू लागले
आता मनी काही मावंना
होण्याआधी विस्फोट
घेशील समजून तू मला,
दुःख माझं तुझ्याशिवाय
नाही कळणार कोणाला
