STORYMIRROR

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Tragedy Inspirational

3  

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Tragedy Inspirational

तगर

तगर

1 min
205

हिरव्या पानात मी

कोवळ्या उन्हात चमकतो मी


कुठला माझ्यात आहे सुगंध

एकपण नाही माझ्यात गंध


कोण आठवतोय मला रोज

एकटाच फुललेला असतो दररोज


सकाळी भरगच्च बहरतो

संध्याकाळी रस्त्यावर गळून पडतो


दिसायला मी शुभ्र पांढरा

पूजेला कोणी नाही घेणारा


विचार करतोय सुगंध नाही

म्हणून देव्हाऱ्यात सजवत नाही


व्यापाराच्या टोपलीत विक्रीला नसतो

घ्यायला मला कोण म्हणे असतो


जखमेला मलाच वापरत

औषधांच्या मी यादीत


कोणाला नाही माझी कदर

मी असाच आहे तगर

मी असाच आहे तगर



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy