निराधार!
निराधार!
तान्हा असता रडण्याने
तिने भूक ओळखली
तुझ्या आजारपणात
तिने रात्र-रात्र जागली!
चालता चालता पडलास
तिने आधार दिला
पडता पडता शिकलास
तिनेच रे उपकार केला!
अडखळून बोलताना
कौतुक तिने केले
तिच्या अडखळण्यावर
तुला का रे हसू आले?
कष्ट करून तुला
जगण्यायोग्य जिने केले
काय रे लेका तुने
वृद्धाश्रमाचे दर्शन घडवले!
