STORYMIRROR

Khushali Dhoke

Inspirational Children

3  

Khushali Dhoke

Inspirational Children

बाप - एक शोध!

बाप - एक शोध!

1 min
181

डोक्यावरच्या छप्परात,

दुःखाच्या त्या कोपऱ्यात,

जबाबदारीच्या ओझ्यात,

"बाप" हा शोधायचा असतो!


सुखाच्या दोन घासात,

मिळणाऱ्या सुखसुविधात,

पुर्ण होणाऱ्या स्वप्नात,

"बाप" हा शोधायचा असतो!


स्वतःमधील आत्मविश्वासात,

स्वतःमागील खंबीर पाठिंब्यात,

प्रतिकुलतेच्या उंबरठ्यावर,

"बाप" हा शोधायचा असतो!


नैराश्यातून जाताना,

दुसऱ्यांवर चिडताना,

आपल्यासाठी केलेल्या कष्टात,

"बाप" हा शोधायचा असतो!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational