STORYMIRROR

Aruna Garje

Tragedy

3  

Aruna Garje

Tragedy

काकस्पर्श

काकस्पर्श

1 min
143

अरे! जीवंतपणीच खाऊ घाला

मेल्यानंतर का वाट

काकस्पर्शाची

फक्त बोला चार शब्द प्रेमाचे

नसे रे अपेक्षा जास्त आमची


जीवंतपणी छळ छळ छळता

नंतर मग ताट भरभरून वाढता

नाही रे होत खाण्याची इच्छा 

वाट का बघता कावळ्याची आता


मरत का नाही एकदाचे 

म्हणायचे रे नेहमीच तुम्ही 

पण तुम्हा लेकरांसाठी अपशब्द

नाही कधीच काढला रे आम्ही 


का हा आता दिखावा 

लोकांसमोर रे तुमचा

आहोत इथे तृप्त आम्ही 

विचार करा तुम्ही स्वतःचा

 

अमर ना या जगी कुणी 

मरण चुकले का कधी कुणा

थकलेल्या माय बापाला 

प्रेमाने फक्त आपले म्हणा 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy