चूक...
चूक...
कोण काय म्हणत हे
नीट ऐकल्या जात नाही
डोळ्यांना सत्य -असत्य
काय ते दिसत नाही
कुठे, कस कळत नाही
पण चुकत जात बरच काही
सतत दुसर्यांच्या चुका,
काढण्यात हो काही अर्थ नाही
आपल चुकतय कुठे हे तर
आपण कधी पाहत नाही
फक्त गैरसमज, वादविवाद
राग ,रूसवा आपल म्हणून
प्रत्येकाची काळजी आता कोणी घेत नाही प्रेमाने, आपुलकीने नाती जोपसण्याची
लोकांमध्ये राहिली
आता कुवत नाही
बोलून गोष्ट सुटत नाही, कृतीतून ही व्यक्त होत नाही
चूक नसतांनाही आरोप होतो
आपल्या बाजूने देखील कोणी आता बोलत नाही
फक्त आशा वाट पाहते कोणत्या शब्दांत नाते गुंफावे उमगत नाही आपल्या माणसांशी आपण कसे वागावे कळत नाही
हव असते तेच कसे बोलायला जमत नाही
बोलले जाते नेमके नको ते पाहिजे होते टाळाया कस सुचत नाही
गुंत्यात गुंतून राहतो आपण
सोडवायचा तर मात्र सुटत नाही
जीवनात आपण चुकत आहोत
असे क्षणोक्षणी वाटूनी जगण मात्र सरत नाही
चूक झाल्यास माफी मागावी घ्यावी थोडी माघार कारण शब्दांना असते खूप धार
कळत असत हे सर्व काही
पण कुठे, कसं कळत नाही चुकत जातं बरंच काही...
