STORYMIRROR

Haresh Magar

Tragedy

4  

Haresh Magar

Tragedy

फक्त आई नाही रे गेली.....

फक्त आई नाही रे गेली.....

1 min
341

खुप वाईट वाटला मित्रा ऐकून, ' आई गेली '

मित्र म्हणाला फक्त आई नाही रे गेली....

कामावरून दमून भागून आल्यावर लागणारी भुक गेली

पावसातून भिजून आल्यावर होणारी काळजी गेली

मित्रा फक्त आई नाही रे गेली....

भर उन्हात मिळणारी माझी सावली गेली

मायेने हात फिरवणारी माझी माऊली गेली

मित्रा फक्त आई नाही रे गेली....

उपाशी झोपलो तरी उठवणारी जाग गेली

उशिरा आलो तरी वाटणारी भीती गेली

मित्रा फक्त आई नाही रे गेली....

सणासुदी होणारी घरातील गडबड गेली

चुकलोच कधी मी तर होणारी बडबड गेली

मित्रा फक्त आई नाही रे गेली....

आईच्या स्वप्नांसाठी जगतो आता मित्रा

पण स्वप्नं पाहणारी ती माय गेली

सर्वस्व गमावून बसलोय मी मित्रा

माझी फक्त आई नाही रे गेली...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy