STORYMIRROR

Dr.ANIL SANGLE

Others

4  

Dr.ANIL SANGLE

Others

सत्यकाव्यमजल

सत्यकाव्यमजल

1 min
492

सत्यकाव्यमजल

(नवकाव्यप्रकार)

समजून

भाग:-१

    (सुरू)


चटके सहन करावे लागे वास्तवात घालता हात,

तयारी असावी तत्पर करण्या विस्तवावर मात


   (आरंभ)


सुख दुःखाचे सत्य अनुभव असती सर्वांपाशी,

नमूद करावा सुरुने दोन ओळींचे यमक प्रथम जुळतात


दुसऱ्या कडव्यापासून पहिली ओळ दुसऱ्या ओळीचा आधार,

दुसऱ्या ओळीत शेवटच्या शब्दात सुरूशी यमक साधतात


  (मध्य)


इतिहास वर्तमान भविष्य उचित ताळमेळ लागतो,

आरंभ मध्य अंत मजलेत यांचं खरं नातं 


माती पाया गाभा कळस मजल सांगे सर्वा,

कल्पनेला नसे थारा मग उलगडे अर्थ जीवनात


मजल असे आधारित सत्य घटनेवर,

लिहीतांना संभाळावे आपलेच करतील घात


समाजातील डोळ्यासमोरील हुबेहूब प्रसंग,

ठिकाणासहीत उमटतो आपुल्या लेखनात


विरोध होणार सदैव मजल नवकाव्यप्रकाराला,

त्यांनीही लावावे शोध आम्ही नाही विरोधात


सन्मानाने पचवावे अपमान मात्र सत्यच उघडावे,

मजल खपवून घेत नाही कुणाचा विश्वासघात


न वृत्त -हस्व दिर्घ लेखन मजल स्वतंत्र शैली,

नियम मुद्देसुद सोप्पे कुणाच्या न अडके बंधनात


सदृष्य काव्य कवीचे नको कधीही कुठेच नुकसान,

शिक्षण घ्यावे शास्रशुद्ध - नुसतेच नको संभ्रमात


    (अंत)


मराठी भाषा सक्षमीकरणासाठी शिलेदार लिहिती,

विनंती आहे सन्माननीयांस सर्वांनी द्यावी साथ


Rate this content
Log in