माय-बाप
माय-बाप
माय-बापाचं अगणित कष्ट
मातीनं घेतलं,
उभ्या आयुष्यात सगळं
रघात ओतलं
माया मायेची कोवळी
उरी अमृताचा झरा,
थेंब रक्ताचा जाळूनी
पाजिला दूध डेरा
बी-भरान लावी आई
तिची लई वेडी माया
मातीतून कोंब पाही
झेप आभाळी माराया
पाणी नेई आबाला आई
माथ्यावर येता ऊन,
माय-बापाचं गुणगान
सांगे पिंजलेलं रान
आबा नांगर हाकायचा
आई चारी गाया-ढोरं,
कधी खुरपणी सोंगणी
युद्ध तिचं घनघोर
सर्जा राजाची बैल-जोड
मळ्यात चालती मोट,
रात-दिन राब-राबुनी
भरविते पोट
असे माय-बाप अडाणी
शब्दांची नसे ओळख,
आम्हा शिकवूनी जीवनी
दूर केला काळोख
सण येता दिवाळी-दसरा
करी मिरची भाकर,
चव त्याची लई न्यारी
जशी मुखी भरी भाकर