STORYMIRROR

Dr.ANIL SANGLE

Others

4  

Dr.ANIL SANGLE

Others

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

1 min
174

अन्यायाला वाचा मी फोडणार आहे,

नराधमांचा काटा आता मी काढणार आहे


माजलेत लिंगपिसाट भोवताली कित्येक

नंग्या तलवारीने त्यास आता मी फाडणार आहे


ऊध्वस्त केले संसार अनेक या नामर्दांनी,

यमसदनी त्यांस आता मी धाडणार आहे


फडकुनी अंबरी फडफड झेंडा समानतेचा,

हे भेदभाव पाताळात आता मी गाडणार आहे


बोंबलू देत सत्ता ही अन् हे शहाणपण,

ही दुहेरी ढोलकी आता मी फोडणार आहे


झुकणे कबुल नाही या वर्तमानाला,

भावी स्त्री शक्ती कालिकेसम आता मी लढणार आहे


भ्रष्टाचार करती देशद्रोही करोडोनी कित्येक,

या घातकी विंचवांची नांगी आता मी उखडवणार आहे


Rate this content
Log in