STORYMIRROR

Dr.ANIL SANGLE

Others

4  

Dr.ANIL SANGLE

Others

ज्ञान-अज्ञान

ज्ञान-अज्ञान

1 min
163

हे रंगरुप मला का शाप आहे

माझा जन्म होणे का पाप आहे।।धृ।।


सोसुनी मी कळा दिवा वंशाचा लावताना,

तरीही गर्भाला भृणहत्येची का तोफ आहे


सांज-सकाळी तुळशी वृंदावन पुजते मी,

तरीही भोवती नशेचे का रोप आहे


संसाराचे ओढते रक्तावर मी ओझे,

तरीही जीवनाला माझ्या का ताप आहे


स्वप्न तडीस नेले ब्रम्हांड पेलण्याचे,

तरीही प्रगतित विष ओतणारा का साप आहे


सर्वनाश मी केला पापी दानवांचा

तरीही भविष्याला ज्ञानाची का झोप आहे


छातीवर माझ्या अगणित वार झेलले मी,

तरीही ऊरात माझ्या भयाची का धाप आहे


Rate this content
Log in