STORYMIRROR

Dr.ANIL SANGLE

Others

4  

Dr.ANIL SANGLE

Others

*शालेय आठवण* भाग-१

*शालेय आठवण* भाग-१

1 min
419

*शालेय आठवण* भाग-१


    *सुरू*


'शाळेमंधी जाता जाता 

तिक्ष्ण काटे तुडवली,

"गुरूजीनी देशासाठी

भावी पिढी घडवली"


    *आरंभ*


'हंगेवाडी ते मालुंजे 

अनवानी चालताना,

"सकाळी व सायंकाळी 

संकटे अती ओढवली"


'फुपूट्यात पाय भाजे

आग मस्तकात जाई,

"पायी घायपात बांधे

डोळे माझे रडवली"


'विजांचा कडकडाट

ढगांचा गडगडाट,

"हृदय धडधडताना

संकटे ती सोडवली"


    *मध्य*


'उष्ण कपडा अंगाला

कधी नव्हता थंडीत,

"दोन फाटके कपडे

आतमंधी दडवली"


'लाल मिरचीचा ठेचा

कधी वांग्याचं भरीत,

"बाजरीच्या भाकरीनं

पोटं आम्ही भरवली"


'खंड विद्युत प्रवाह

खोळंबा डिप्पीचा होता,

"कंदीलाच्या उजेडात 

पहाट उजडवली"


*अंत्य*


'अठ्ठाहास नाही थारा

मदत आई बापास,

"ती जुनीच पुस्तक 

नवी मस्तक घडवली"



Rate this content
Log in