STORYMIRROR

Dr.ANIL SANGLE

Others

3  

Dr.ANIL SANGLE

Others

चुकलेले गणित

चुकलेले गणित

1 min
11.3K

'आम्हा भारतीयांपूढे

कोरोना तू हरणार,

"कोरोना भारतामध्ये 

तु नक्कीच मरणार"


'भारतीय लोकांसाठी

शेतकरी गाळी घाम,

"जगवी देश करतो

विना घाबरता काम"


'पोलीस नर्स डॉक्टर

माझा सुरक्षा रक्षक,

'कंडक्टर ड्रायव्हर 

यानां हि केले भक्षक"


'अत्यावश्यक सेवेचा

हरवेळी अभिमान,

"मानवानो भविष्यात

करूया सारे सन्मान"


'वस्तू जपून वापरू

योग्य भरूया किराना,

"काळजी घेतो भारत

नष्ट कराया कोरोना"


'कोरोनाच्या काळामधी

बंद करू भ्रष्टाचार,

"क्रोध द्वेष मत्सर ह्या

विरोधात शिष्टाचार"


'गरीब श्रीमंत जात 

पात धर्म हि जमात,

"मानव म्हणून राहू

लक्ष कोरोनास मात"


'भविष्यात देशासाठी

सर्व लावू हातभार,

"संसाराचे चुकलेले 

गणित सुधरणार"


Rate this content
Log in