ARUN BIJWE
ARUN BIJWE
‼️ आगडोंब झेलतांना
चार मास उन्हाळ्याचे
जैवजीवा वेध लागे
चातकांगी पावसाचे. ‼️१‼️
‼️ आगमन पावसाचे
झाले आता चहुकडे
सृष्टी सारी आसुसली
चिंब भिजण्यास गडे. ‼️२‼️
‼️बरसल्या जलधारा
मृदगंध उधळीत
विहरती जळी स्थळी
पशुपक्षी उल्हासित. ‼️३‼️
‼️ रानोमाळ,दरीखोरी
सभोवार हिरवळ
मखमली शालु शोभे
नदी,नाले खळखळ. ‼️४‼️
‼️ होऊ देई सुगंधित
शब्द शब्द नवोदित
जावू देई भिजूनिया
मनोमनी चिंबवीत. ‼️५‼️
‼️ सप्तरंगी इंद्रधनु
नभांगणी विलोभीत
हर्षे नाचती मयूर
गाती कोकीळही गीत.‼️६‼️
‼️पाने फुले प्रफुल्लित
पारीजातकाचा सडा
भिजवीत भावनांना
जणू हासण्याचा धडा. ‼️७‼️
‼️दवबिंदू पर्णोपर्णी
मोतीयांची सारी रास
क्षण भ-याचे आयुष्य
गंधाळती हमखास. ‼️८‼️
‼️ मनाजोग्या पावसाने
आनंदला बळीराजा
जुंपविले बैलांसवे
पेरणीच्या कामकाजा.‼️९‼️
‼️जगताचा पोषिंदाची
बळीराजा एकमेव
स्वप्ने त्याची पुर्ण करी
त्याला सदा सुखी ठेव.‼️१०‼️.
