STORYMIRROR

Omkar Keskar

Romance

4  

Omkar Keskar

Romance

तुझ्याचसोबत

तुझ्याचसोबत

1 min
236

तुझ्याचसोबत होतो म्हणूनी सहज संपली वाट 

चालेस्तोवर अंबरात या धुके दाटले दाट


तुझ्याचसोबत होतो म्हणूनी कसलाही हिशेब नव्हता

कुठे जायचे ? कसे जायचे ? कसलाही प्रश्नच नव्हता 


तुझ्याचसोबत होतो म्हणूनी सुस्पष्ट झाली दिशा 

तूच माझं व्यसन नि आता तूच माझी नशा 


तुझ्याचसोबत होतो म्हणूनी अधिकच गुंतत गेला जीव 

उरलं आता दोघांमध्ये केवळ जाणीव आणि नेणीव 


तुझ्याचसोबत होतो म्हणूनी जुळले धागे बसली वीण 

हात तुझा हाती आल्यावर कसला थकवा, कसला शीण


तुझ्याचसोबत होतो म्हणूनी अस्तित्व आज दरवळले

समेवरती येई येईतो सारे शब्द नि सूर विरघळले 


तुझ्याचसोबत होतो म्हणूनी ग्रीष्मात बरसल्या सरी

गात्रांचा जाहला कंप अन अंगार चेतला उरी 


तुझ्याचसोबत होतो म्हणूनी ऐलाकाठी आला पैल 

बंधन तुटले देहाचे या अन पंचप्राण झाला सैल 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance