कळले मला न केव्हा...
कळले मला न केव्हा...
कळले मला न केव्हा
पायात बोचला काटा
झाल्या बंद अचानक
साऱ्याच तहाच्या वाटा
निवळले नभ सारे
कळले मला न केव्हा
हरवले सुर कसे
होतो कुठे मी तेव्हा
ही केव्हा कशी दाटली
डोळ्यांत तमाची लाट
कळले मला न केव्हा
ही कशी संपली वाट
अहंपणा ह्रदयीचा
तो आला अंतरी केव्हा
हा देह दरिद्री झाला
कळले मला न केव्हा