Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

rupali hambarde

Romance Others

4.4  

rupali hambarde

Romance Others

बहर प्रेमाचा.........

बहर प्रेमाचा.........

1 min
292


शिशिराची सोसूनी पानगळ 

वसंत होऊन फुलण्याचा,

साऱ्या ऋतूत जपावा 

हा बहर खऱ्या प्रेमाचा!

स्पर्शाविनाही झंकारावी 

वीणा अशी अलवार ,

बरसात सुरांची व्हावी 

तू छेडताच मल्हार!

मौनातून उलगडावे 

अव्यक्त भाव अंतरीचे ,

नजरेतून व्यक्त होता 

स्वर उमलावे मुरलीचे!

घन ओथंबून येता 

श्रावणसर ओघळावी,

चिंब चिंब देहावर 

खूण थेंबाची उमटावी!

ऋतु पुनः यावा फुलोनी

जणू नियम निसर्गाचा ,

हळव्या सांजवेळी पुनः 

हृदयात बहर प्रेमाचा!


Rate this content
Log in